लोहोणेर : राहत्या घरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या


लोहोणेर : - येथील रहिवाशी व नुकताच बी. ई. सिव्हिल इंजिनिअरिंग झालेला युवक ललित रमेश जोशी (वय २३ ) याने आज सकाळी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्याचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील रहिवाशी असलेले रमेश रामदास जोशी यांचा लहान मुलगा ललित रमेश जोशी (वय २३ ) हा नुकताच बी. ई. सिव्हिल इंजिनिअरिंग परीक्षा उत्तीर्ण झाला होता. आज सकाळी साडे दहाचे सुमारास घरी कोणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे वडील रमेश जोशी हे घरी आल्यावर सदर प्रकार उघडकीस आला. देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्या नंतर सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे पश्चात आई, वडील, एक मोठा भाऊ असा परिवार आहे.याबाबत देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश सोनवणे व कोरडे हे पुढील तपास करीत आहेत.


-----------------------------------------------------





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :