लोहोणेर (प्रतिनिधी ) : - कोरोना काळात राज्य शासनातर्फे गरजू आदिवासी बांधवासाठी सुरू करण्यात आलेल्या खावटी योजने अंतर्गत विठेवाडी ता.देवळा येथील लाभार्थ्यांना डॉ. दौ. सो. आहेर आश्रम शाळा येथे अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.यावेळी विठेवाडी येथील विकास सोसायटीचे संचालक विलास निकम, भऊरचे सरपंच दादा मोरे, लोहोणेरचे योगेश पवार, अनिल आहेर, प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे, माध्यमिक आश्रम शाळेच्या श्रीमती मुख्याध्यापिका जी. एस. सूर्यवंशी, प्राथमिक आश्रम शाळेच्या श्रीमती पी. बी. देवरे, रामदास निकम, विलास पवार, अधीक्षक पी. के. पवार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, वर्ग चार चे कर्मचारी आदी सह विठेवाडी, सावकी येथील आदिवासी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भगवान आहेर यांनी केले.
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtu.be/7GE0fGcxUGo