महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या देवळा तालुकाध्यक्षपदी खंडू मोरे यांची निवड

Top Post Ad

 पंडीत पाठक (विशेष प्रतिनिधी ) : - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न देवळा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी खामखेडा ( ता.देवळा  )  येथील दैनिक सकाळचे  बातमीदार  खंडू मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज कळवण येथे प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत सर्वानुमते खंडू मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
      महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे दिवंगत देवळा तालुकाध्यक्ष मिलिंद पगार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या तालुकाध्यक्ष पदाच्या जागेसाठी कळवण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी देवळा तालुकाध्यक्षपदासाठी खंडू मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. खंडू मोरे यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
       पत्रकार संघाच्या आढावा बैठकीत पत्रकारांना मार्गदर्शन करताना विश्वासराव आरोटे म्हणाले की, पत्रकारीता करताना पत्रकार बांधवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते अनेक वेळा त्यांच्यावर जीवघेणा  प्रसंग उदभवत असतो. अशा कठीण  परिस्थितीत  त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आजपर्यंत करीत आलेला आहे. आणि यापुढेही करणार आहे.पत्रकारांनी समाजाचे प्रश्न निर्भीडपणे मांडून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
       यावेळी राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव,ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिपक गांगुर्डे, जिल्हा पदाधिकारी सोमनाथ जगताप,नाशिक शहराध्यक्ष दिलीप कोठावदे,देवळा तालुका संपर्कप्रमुख विनोद देवरे,पंडीत पाठक,दिनेश सोनार,भिला आहेर,आदिनाथ ठाकूर,विष्णू शेवाळे,विश्वास पाटील,शरद पवार,महेश शिरोरे,देविदास बोरसे,विकास आहेर,सुभाष मोरे,मोठाभाऊ मोरे,नामदेव थोरात,मनोज वैद्य,जगदीश निकम,वैभव पवार आदिंसह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.