लोहोणेर : राष्ट्रीय पोषण आहार दिन साजरा

लोहोणेर : - येथे आज राष्ट्रीय पोषण आहार दिन साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून परिसरात रॅली काढण्यात आली. अंगणवाडी सेविकांनी सदर रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने लोहोणेर १व २,माळीवाडा, सतीखांब, बर्डेशिवार येथील अंगणवाडी केंद्र सहभागी होत्या.
सदर रॅली ही लोहोणेर येथील सावता महाराज मदींर, परदेशीवाडा, माळीवाडा येथे काढण्यात येवुन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यात माळीवाडा केंद्राच्या केंद्रसेविका सौ. मनिषा आहिरे यांनी पोषण आहारा विषयी सविस्तर माहिती दिली. या अनुषंगाने तरी दि. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत विविध कार्यक्रमांचे घेतले जाणार आहेत. या पोषण आहार रॅलीत लोहोणेर ग्रामपंचायतीचे सदस्य रतिलाल परदेशी, गणेश शेवाळे, रमेश अण्णा अहिरे,तसेच प्रतिष्ठीत नागरीक सुरेश परदेशी व किशोरवयीन मुली,इतर महीला व मंडळाच्या अध्यक्षा तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्प देवळा येथील लोहोणेर केंद्राच्या पर्यवेक्षिका श्रीमती के.एस.चव्हाण, लोहोणेर येथील अंगणवाडी सेविका श्रीमती शोभा जाधव, मनिषा आहीरे, आशा तिसगे, रेखा बागुल, वंदना महाजन, तसेच आशा सेविका सौ. संगिता तिसगे, प्रमिला शेवाळे, तृप्ती पवार, व अंगणवाडी मदतनीस उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :