पुण्यात आकुर्डी परिसरामध्ये आज डी. वाय. पाटील ज्ञानशांती शाळेचा उद्घाटन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये तरुणांच्या कौशल्याविषयी आणि नवीन काहीतरी करण्याच्या इच्छाशक्तीविषयी आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना सतेज पाटील हे पन्नाशीला पोहचले तरी काँग्रेसने अजूनही त्यांना राज्यमंत्रीच ठेवलय हे आपल्याला समजतच नाही, जस आम्हाला पवार साहेबांनी ३८, ४० वय असताना कबिनेट पद दिली तसा सतेज पाटील यांचा विचार व्हावा, त्यावेळी, पवार म्हणाले कि, राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री अधिकारात खूप फरक असतो. त्यामुळे नवीन पिढीला पुढे आणण्यासाठी शरद पवार यांनी आम्ही अडोतीस, चाळीस वर्षांचे असताना मला, आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांना कॅबिनेट पद दिली. महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे काम करतात. नेहमी चर्चा करताना त्यांच्यात नवीन काहीतरी करण्याची कल्पना, धाडस, व्हिजन असते. त्याप्रमाणे सतेज पाटील, विश्वजित कदम हे काम करतात. शेवटी राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकारात खूप फरक असतो. आपण दोन्ही ठिकाणी काम केलेले आहे. त्यामुळे राज्यमंत्र्यांनी एखादा निर्णय घेतला तरी जोपर्यंत कॅबिनेट मंत्री त्यांना मनमोकळेपणाने सपोर्ट करीत नाहीत. तो पर्यंत त्यांना योजना राबविता येत नाही.
-----------------------------------------------------
☑️कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig