लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - लोहोणेर गिरणा नदी पात्रात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला गणपती बाप्पा मोरया !पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत भावपूर्ण निरोप दिला.तरी गणेश विसर्जनासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासन व पोलीस प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार मूर्ती विसर्जनासाठी लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने गिरणा नदी पुलाचे पूर्व बाजूस दर वर्षा प्रमाणे पात्रात विशेष व्यवस्था केली होती. शासनाच्या नियमानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत वेळ विसर्जनासाठी निर्धारित केली होती.
या अनुषंगाने कोरोणा संकटाच्या पार्श्वभूमीवर भक्तांना मुर्ती विसर्जनाच्या ठिकाणी मास्क बांधून व शारीरिक अंतर ठेवण्याचे आवाहन लोहोणेर ग्रामपंचायत प्रशासन व देवळा पोलिस प्रशासनाने केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भक्तांनी कोरोना नियमांचे व शिस्तीचे तंतोतंत पालन करण्यात आले तर काही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व गणेश भक्तांनी विना मास्क श्री चे विसर्जनात धन्यता मानली. बाप्पाच्या विसर्जनासाठी सकाळ पासूनच घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेश विसर्जनासाठी लगबग सुरू होती.
यावेळी विसर्जनासाठी देवळा-सटाणा तालुक्यातील तसेच लोहोणेर पंचक्रोशीतील भाविक गणरायाला निरोप देण्यासाठी आले होते. लोहोणेर येथील न्यु शिवगर्जना गणेशभक्तनीं मिरवणुकीत कोरोणा नियमांचे वेगवेगळे पोस्टर्स प्रदर्शित केले. तसेच देवळा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा माजी जबाबदारी या अभियाना अंतर्गत खास निर्माल्य,प्लस्टीक, पिशव्या ची विल्हेवाट लावण्यासाठी व मुर्ती संकलनासाठी स्वतत्र व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे सदर निर्माल्य चे रुपांतर खतामध्ये होणार आहे.दरम्यान पोलिस अधिक्षक अमोल गायकवाड यांनी भेट तर देवळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास भोज, पोलिस उपनिरीक्षक जावळे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते, पोलिस पाटील अरुण उशीरे,ग्रामसेवक यु.बी. खैरनार, सदस्य, योगेश पवार यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
☑️कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig