मालेगाव येथील एका दैनिकाने आक्षेपार्ह विधानाचे लिखान केल्याबद्दल सुवर्णकार समाजाचे देवळा पोलिसांनानिवेदन देताना समाजबांधाव

देवळा : - मालेगाव येथील एका  दैनिकाने सुवर्णकार समाजाबद्दल आक्षेपार्ह  विधानाचे लिखान केल्याबद्दल देवळा तालुका सराफ असोसिएशनचे वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत देवळा तालुका सराफ असोसिएशनचे वतीने देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास भोज यांचेशी चर्चा करून आय.पी.सी. कलम ५०१ अन्वये समाजाची व सुवर्णकार व्यवसायीकांची बदनामी करणाऱ्या मालेगाव येथील दैनिकावर व संबंधित संपादकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देवळा तालुका सराफ असोसिएशनचे वतीने करण्यात आली आहे. याप्रसंगी देवळा तालुका सराफ असोसिएशन अध्यक्ष चंद्रकांत अहिरराव, देवळा तालुका अहिर सुवर्णकार समाज संस्था अध्यक्ष पवन अहिरराव, सचिव मनोज अहिरराव, खजिनदार दिनेश जाधव (सोनार), रोहन वडनेरे, प्रशांत अहिरराव, अरूण खरोटे, हिरामण जाधव आदी. सराफ बांधव, युवक व समाज बांधव उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :