गरीब - श्रीमंत विषमता दूर करण्यासाठी समाजाने पुढे यावे ! -- रविकांत तुपेकर

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - आपला देश इंडिया आणि भारत असा विभागला जात असून यातून गरीब-श्रीमंत अशी विषमता वाढत चालली आहे. ती कमी करण्यासाठी उन्नत समाजाने पुढे यायला हवे, आणि यातून व्यक्त होणारी सामाजिक बांधिलकीची भाषा कृतीशील असावी असा आशावाद माजी राज्यमंत्री व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जागवला. शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट च्या वतीने रविवार (ता.५) रोजी देवळा येथील अनाथ व निराधार मुलांना मदतनिधी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. प्राचार्य हितेंद्र आहेर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्री.तुपकर श्रोत्यांशी संवाद साधतांना म्हणाले कि अनाथ, निराधार, गरजू, गरीब, पीडित यांना मदत करण्यासाठी दातृत्वाची भावना मनात असावी व जागवावी लागते. सामान्य माणसानेही आता व्यवस्थेविरुद्ध आपला आवाज बुलंद करायला हवा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.डी.के.आहेर यांनी केले. यावेळी २७ अनाथ व निराधार मुलांना धनादेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडे व महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुपचे संस्थापक अनिकेत घुले यांना शिवनिश्चल पुरस्कार, शिंदेशाही पगडी व मानपत्र देत सन्मानित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा इतरही महान विभूतींचे विचार पेरण्यासाठी तसेच समाजहिताचे उपक्रम करण्यासाठी आपला कायम प्रतिसाद असतो अशा शब्दात अनिकेत घुले यांनी आपल्या मनोगतात विचार मांडले. या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी या कार्यक्रमाचा हेतू विषद करतांना सांगितले कि जगात बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत आपण कृती करणारे होऊया. मागील वर्षी कोरोनाकाळात निराधारांना आधार देण्यासाठी घरोघरी जात मदतनिधीचे वितरण केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, उमराणे बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र देवरे यांनी मनोगते व्यक्त केली. ....राजेंद्र गोसावी, देवळा महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर, महारोजगार केंद्राचे संस्थापक भाऊसाहेब पगार, देमकोचे व्हा.चेअरमन राजेंद्र वडनेरे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस शिवशाहीर सुरेश जाधव व त्यांच्या सहकार्यांनी शाहिरी गीते व पोवाडे सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. सूत्रसंचालन पूनम गोसावी व ऋषिकेश गोसावी यांनी केले तर भगवान आहेर यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी महिलावर्गासह येथील व राज्यभरातील शिवनिश्चलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवनिश्चल कोअर कमिटीच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

 
गेल्या सहा वर्षांपासून हा अनाथ निराधार मुलांना मदतनिधी उपक्रम चालू आहे. आतापर्यंत आत्महत्याग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त तसेच इतर आपत्तीग्रस्त अशा ....कुटुंबांना मदत शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट च्या वतीने मदत पोहोच झाली आहे. तसेच ता संस्थेने ...अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. आगामी काळात अशा मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्याचा मानस असल्याचे यशवंत गोसावी यांनी सांगितले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :