लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती.ह्यात देवळा तालुक्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस ,प्रहार सघंटना व घटक पक्ष सहभागी झाले होते. लखीमपूरमधील घटनेवरून राज्यातील जनतेच्या तीव्र भावना बंदमध्ये दिसुन आल्या. देवळा शहर व ग्रामीण भागात लोकांनी आपली दुकाने व व्यापारी बंधुनी आपले व्यवहार बंद ठेवले होते.जीवनावश्यक सुविधांना या बंदमधुन वगळण्यात आले होते. देवळा पाचकदींल परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रांतिक सदस्य योगेश आहेर, राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल आहेर,जि. प. सदस्य यशवंतराव शिरसाठ, समता परिषदेचे आबासाहेब खैरनार,शिवसेना शहरप्रमुख मनोज आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दिलीप पाटील, तालुका प्रमुख सुनील पवार, जगदीश पवार, संतोष शिंदे,सचिन सुर्यवंशी, मनोज गुजरे, विश्वनाथ गुंजाळ.आदी महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. लोहोणेर येथे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला यावेळी सामाजिक कार्यकर्ते कांग्रेसचे योगेश आबा पवार, समता परिषदेचे रमेश अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जाकीर शेख, उपाध्यक्ष दिपक देशमुख ,शहराध्यक्ष मनोज देशमुख, नागेश निकम आदीं पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
तालुक्यातील खर्ड या गावात बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दुकानदारांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्त ने बंद ठेवण्यात आली होती.यात प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, भाऊसाहेब मोरे, शशिकांत पवार,बापु देवरे, राष्ट्रवादी काँग्रेस चे संदीप पवार, शिवसेनेचे विजय जगताप, शेतकरी व नागरिकांकडून घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत दोषींवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली. विठेवाडी येथे ही कडकडीत बंद पाळण्यात आला व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. तर यात राष्ट्रवादी नेते पंडित निकम, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष धनंजय बोरसे,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कुठलाही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडला.
---------------------------------------------------
☑️कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig
