महामार्गावरील काटेरी झुडपे युवकांनी काढली स्वखर्चाने

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अक्षम दुर्लक्षित असलेल्या साक्री - शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सटाणा - देवळा दरम्यान सावकी फाटा ते हिंदुस्थान पेट्रोल पंप पर्यत महामार्गाचे दुरफा काटेरी झाडाचे अतिक्रमण झाल्याने सदर रस्त्यावर नियमित लहान - मोठे अपघात घडत असल्याचे या परिसरातील सेवा भावी युवकांनी लोकवर्गणीतून सदर ठिकाण ची सुमारे दोन किलोमीटर पर्यतचा महामार्गाने मात्र मोकळा श्वास घेतला आहे. सदर महामार्गावर या परिसरात गेल्या एक महिन्यात सुमारे चार ते पाच अपघात घडले असून या अपघातात जीव गमवावा लागला आहे. या अपघाताला कारणीभूत ठरत असलेल्या रस्त्यावरील काटेरी झुडपाकडे संबंधित खाते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. व अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. म्हणून या रस्त्यालगत वास्तवस असलेले गणेश जाधव, सुनील निरभवणे, राजेंद्र जाधव, दीपक पवार, सुनील सोनवणे, सोनू आहिरे, तुळशीराम जाधव, बंटी सोनवणे, भैय्या आहिरे आदी सेवाभावी युवकानी लोकवर्गणीतून पैसे जमवून जेसीबीच्या सहाय्याने सुमारे दोन किलोमीटर पर्यटचे काटेरी झाडे व झुडपे काढल्याने सदरचा हम रस्ता मात्र आता मोकळा श्वास घेत आहे. यामुळे दुचाकी स्वार अथवा इतर वाहन चालकानी समाधान व्यक्त केले आहे. या युवकांचा आदर्श घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आल्यानंतर या राष्ट्रीय महामार्गा वरील दोन्ही बाजूला असलेली काटेरी झाडे काढली जातील अशी रास्त अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व वाहन चालकांनी व्यक्त केली आहे.

---------------------------------------------------

            


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :