लोहोणेर परिसरात बीएसएनएल सेवेचा बोजवारा ! अपुरा कर्मचारी वर्ग ! संबंधित विभागाचे दुर्लक्ष

लोहोणेर (प्रतिनिधी ) : - भारतीय दूर संचार निगमचे वसाका कार्यस्थळावरील एकचेंज केंद्र गेल्या दीड वर्षा पासून बंद अवस्थेत असून या केंद्रा कडे दूरसंचार खात्याचे सोयीस्कर रित्या  दुर्लक्ष असल्याने या केंद्रावर अवलंबून असलेल्या गावांत बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला असून बीएसएनएल सर्वत्र आउट ऑफ रेंज होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी दूरसंचार निगम म्हणजे सर्वसामान्य ग्राहकाच्या गळ्यातील ताईत होते. इतर खाजगी कंपन्या या क्षेत्रात कार्यरत होण्यापूर्वी बीएसएनएल चा सर्वत्र बोलबाला होता. घराघरांत लँडलाईन फोन (दूरध्वनी ) चा आवाज ऐकू येत होता. संगणकीय प्रणालीत बीएसएनएल चा सर्वत्र समावेश होता. बीएसएनएल शिवाय कोणाचे पान हलत नव्हते. मात्र खाजगी कंपन्यानी या क्षेत्रांत पाऊल टाकल्या नंतर बीएसएनएल ला खऱ्या अर्थाने घरघर लागली असली तरी संबंधित विभागांचे अक्षम दुर्लक्ष याला कारणीभूत ठरले आहे. मोबाईल यंत्रणा चालू झाल्यानंतर घरोघरी खणखणारे लॅण्ड लाईन फोन बंद झाले.पर्यायाने घरात होणारे बोलणे भर रस्त्यावर आले. प्रत्येकाच्या खिश्यात मोबाईल फोन वाजू लागले.त्यात विदेशी कंपन्यानी आणखी भर घातली. त्यामुळेच बीएसएनएल चे भविष्य धोक्यात आले. पर्यायाने ग्राहकानी पाठ फिरवली.यंत्रणा विस्कळीत झाली. मुळात अपुरा कर्मचारी वर्ग त्यामुळे ग्राहकांना सेवा सुरळीत पणे न मिळाल्याने ग्राहक दुरावत गेला पर्यायाने तो इतर खाजगी कंपनी कडे वळला.त्याचा फटका बीएसएनएल ला बसला.देवळा तालुक्यातील ४९ गावाचा कारभार सद्य स्थितीत फक्त दोनच रोजनदारी कर्मचारी पाहत आहेत. तालुक्यातील   असलेल्या सात दूरध्वनी केंद्राची जबाबदारी त्यांच्यावर आहे.या संगणकीय प्रणाली असलेल्या केंद्रांमध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला तर कळवण येथून कर्मचारी उपस्थित केला जातो. तोही वेळेवर येईल याचा भरोसा नाही. आशा परिस्थितीत बीएसएनएल नीटसे चालेल कसे असा प्रश्न निर्माण होतो. मुळात अपुरा कर्मचारी वर्ग, कुशल ऑपरेटर नाहीत,  पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. ही जरी कारणे खरी असली तरी संबंधित विभागाचे असलेले  अक्षम दुर्लक्ष हे ही तितकेच महत्वाचे आहे. वसाका कार्यस्थळा वर आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून सगणकीय प्रणाली असलेले दूरध्वनीकेंद्र व मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे.  मात्र सदरचे केंद्र हे गेल्या दीड वर्षा पासून बंद अवस्थेत असल्याने ते मुळात चालू आहे की बंद हेच कळत नाही. हया केंद्रावर अवलंबून असलेल्या गावांत कुठेही बीएसएनएल ची रेंज सुरळीत रेंज मिळत नाही. वसाका कार्यस्थळा वर याची वारंवार प्रचिती येते. येथील बीएसएनएल चा टॉवर हा शोभेची वस्तू ठरली असून रेंज मिळत नसल्याने भ्रमण ध्वनी ग्राहकांनी कधीच आपले कार्ड मोबाईल मधून काढून फेकून दिले आहेत. एकंदरीत या परिसरात बीएसएनएल चा पुर्णपणे बोजवारा वाजला असून सतत खंडित व वेळोवेळी गायब  होणाऱ्या सेवेला  भ्रमण ध्वनी ग्राहक मात्र चांगलेच वैताकले आहेत.

---------------------------------------------------

☑️कसमादे मराठी न्यूज 👇

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad