सिन्नर : आरोग्य कर्मचारी मारहाणीच्या निषेधार्थ सर्व संघटना एकवटल्या, दोषी व्यक्तींवर 353 कलमान्वये गुन्हा दाखल!

सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे कोविड लसीकरण सत्राच्या कामकाजात हस्तक्षेप करुन महिला व पुरुष आरोग्य कर्मचारी यांना जीवघेणा हल्ला करुन मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर कलम ३५३  लावावा व दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ च्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व संवर्ग संघटना एकत्र झाल्या व त्यांनी जिल्हा परिषद आवारात सदर घटनेचा निषेध करून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्या संबंधित दोषी व्यक्तींवर 353 कलम लावण्यासंदर्भात तसेच लसीकरण केंद्राच्या ठिकाणी पोलीस संरक्षण मिळावे, 
तसेच सर्व कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन संघटना ची बोलणीसाठी सर्व खाते प्रमुख यांनी वेळ द्यावा अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर दोषी व्यक्तींवर 353 कलम लावण्यासंदर्भात सिन्नर पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा व तेथे सदर केस दाखल करणे संदर्भात दुजोरा दिला त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेचे पदाधिकारी दुपारी दोन पासून रात्री आठ वाजेपर्यंत सिन्नर पोलीस स्टेशन येथे थांबले व  त्याबाबत पोलीस निरीक्षक मुटकुळे यांना याबाबत चर्चा करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी यांनी गुन्हा दाखल करून त्याबाबत कार्यवाही करत असल्याचे सांगण्यात आले. सदर दोषी व्यक्तीवर 353 ,323 ,504, 506, 34 व 4 कलम लागू केल्यामुळे व दोषी व्यक्तीस अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक यांनी सांगितले. 
यापुढे सर्व कर्मचारी वर्गाने आपणास नेमून दिलेले शासकीय निकषाप्रमाणे सर्व कामकाज करण्यात यावे तसेच नागरिकांची गैरसोय होऊनये यासाठी लसीकरणाचे काम सुरू करणार असल्याबाबतचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व   महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना शाखा नासिक व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस कर्मचारी संघटना व सर्व संवर्गीय संघटना यांनी आपले  इतर यांनी आपली सर्व कामे करण्यास हरकत नसल्याबाबतचे  आवाहन करणेत आलेले आहे. सदर प्रकरणात सर्व  संघटना एकत्र झाल्या बद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद  नर्सेस  संघटना यांनी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सर्व संवर्गीय संघटनांचे सर्वांचे आभार मानलेले आहे.

-----------------------------------------------------




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :