कांचनबारी रस्त्याचे काम लवकर सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा जि. प. सदस्या डॉ.नुतन आहेर यांचा इशारा
0Pandit PathakSeptember 21, 2021
देवळा- (दि.२१) कांचने येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमा प्रसंगी जमलेल्या नागरिकांच्या तक्रारीवरून व माहिती वरून वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य डॉ. नूतन सुनील आहेर यांनी त्वरित भ्रमणध्वनी द्वारे शाखा अभियंता शेवाळे यांच्याशी संपर्क साधत देवळा-वाजगाव-खर्डे ते कांचन बारी या प्रजीमा-६१ रस्त्याचे रस्ता सुधारणा करणे काम सुरू होऊन अनेक महिन्यांपासून काम पूर्ण न करता थांबल्याने रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून देवळा तालुका व परिसरातील अनेक शेतकरी बांधव आपला शेतमाल विविध वाहनांद्वारे पिंपळगाव (ब), चांदवड येथे विक्रीसाठी नेत असतात खराब रस्त्यामुळे त्यांची कुचंबणा होते तसेच वळण मार्गावरील
खड्ड्यांमुळे अपघात प्रवण क्षेत्र बनले असून लवकरात लवकर काम सुरू न केल्यास पालकमंत्री नामदार भुजबळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत प्रसंगी त्यांच्या कडे तक्रार करून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर, सरपंच श्रावण आप्पा, माणिक शिंदे, आबा सावकार, गोविंद बर्वे, संतोष शिंदे, सतीश शिंदे, नामदेव हेंबाडे, जिभाऊ हेंबाडे, बापू आघाव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.