देवळा तालुका तहसीलदारपदी विजय सुर्यवंशी!

लोहोणेर (प्रतिनिधी ) : - देवळा तालुक्याचे तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांची मालेगाव येथे बदली झाल्यानंतर रिक्त असलेल्या तहसीलदारपदी सुरगाणा येथील तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले विजय सुर्यवंशी यांची देवळा तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विजय सूर्यवंशी हे मंगळवारी देवळा तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारणार असल्याचे समजते. मागील दिड महिन्यापूर्वी तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांची मालेगाव येथे बदली झाली होती. आणि त्यानंतर देवळा तहसीलदारपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. दत्तात्रेय शेजूळ यांची बदली झाल्यानंतर प्रभारी तहसीलदार म्हणून विजय बनसोडे हे कामकाज पाहत होते. रिक्त असलेल्या जागी सुरगाणा तालुक्याचे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले विजय सुर्यवंशी यांची देवळा तालुक्याचे तहसीलदार म्हणून निवड करण्यात आली आहे.याबाबत दि.१७ रोजी तसे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :