लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - लोहोणेर गाव व परिसरात डेंग्यू, चिकन गुनिया, मलेरिया सारख्या साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीने ॲक्शन मोडवर येऊन गावातील रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाने नागरीकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतः आपल्या घरात स्वच्छता ठेवण्याचे आवाहन गावात दवंडी देऊन करण्यात आले आहे.कोरोना महामारीच्या विषाणू ची दुसरी लाट ओसरत नाही. तोच साथीच्या आजारांचे संक्रमण सुरू झाले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या चिंतेत पुन्हा भर पडल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. लहान मोठे सर्वच खाजगी दवाखान्यात पेशंटची गर्दी पाहावयास मिळते आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याची त्वरित दखल घेत चिकनगुनिया, डेंग्यू सारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ॲक्शन मोडमध्ये आहे.
साथीच्या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने अनेक स्वच्छतेची कामे हाती घेतली आहे. सांडपाण्याचा निचऱ्याची ठिकाण,खुली व झाडे झुडपे असलेली जागा, वाडी-वस्ती,गल्ली-बोळ, येथे प्रतिबंधात्मक फवारणी ग्रामपंचायत कर्मचारी करीत आहेत. यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व तेथील कर्मचारी रात्रीचा दिवस करीत आहेत.
☑️कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig