चांदवड ( प्रतिनिधी ) : - काही दिवसापूर्वी चांदवड शहरात माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या राहत्या घरातून चोरटय़ांनी लाखो रुपये लंपास करित खळबळ माजवली होती. मिळालेल्या माहितीनुसार यात लाख रुपये किमतीचे मनीमगंळसुत्र, सोन्याची पोत, सोन्याच्या बांगड्या, चांदीचे जोडे, पायल, आदी दागिने स्टॅम्प पेपर,व इतर दस्तऐवज चोरटय़ांनी लंपास केला होता. याबाबत राहुल शिरीषकुमार कोतवाल यांनी चांदवड पोलीस स्टेशन ला फिर्याद दाखल केली होती. कोतवाल कुटुंबीय घराचे कुलूप लावून शेतात वस्तीवर राहण्यासाठी गेले असताना अज्ञात चोरटय़ांनी संधीचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत लाखो रुपयांचा चलनी नोटा व दागिने लंपास केले होते. यानंतर पोलीस अधीक्षक मालेगाव व पोलिस उपअधीक्षक मनमाड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास चांदवड पोलीस ठाणे करीत होते. यानंतर पोलीसांनी तपास करून पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या विशेष पथकाने लासलगाव येथे आरोपींना (नाव : - रमजू भैय्यालाल पठाण वय ३९ ) यास मुद्देमालासह अटक केली आहे.
बातमी व जाहिराती साठी संपर्क :
8390172101 / 9765227710 / 7875281316
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/DrMh1FvmNNu66MyowfFXov
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig