देवळा ( प्रतिनिधी ) : - नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीवर बागलाण तालुक्यातुन पदाधिकारी म्हणुन काम करत असलेले सर्व जिल्हा पदाधिकारी बरखास्त करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सर्वच जिल्हा पदाधिकारी चांगले काम करण्यासारखे आहेत. परंतु समन्वयाच्या अभावामुळे पक्ष संघटनेच्या गटनिहाय जबाबदार्यांमध्ये काम होताना दिसत नाही. त्यामुळे आपणास पक्ष निरीक्षक सुनिल आहेर यांनी तसेच जिल्हाघ्यक्ष यांनी वेळोवेळी दिलेल्या जबाबदार्यांचे पालन न केल्यामुळे आपणास कार्यमुक्त का करण्यात येवु नये. अशी वॉर्निंग देखिल यापुर्वी देण्यात आली होती.
त्यामुळे नविन पुढील निर्णय होईपर्यंत
*आज पासुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारणीवर बागलाण तालुक्यातून कोणीही नसेल.*
नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती लवकरच करण्यात येईल. जुन्या पदाधिकाऱ्यांनी कुठलेही पदे वापरु नये असे कडलग यांनी स्पष्ट केले आहे.
बातमी व जाहिराती साठी संपर्क :
8390172101 / 9765227710 / 7875281316
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/DrMh1FvmNNu66MyowfFXov
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig