लोहोणेर -प्रतिनिधी - लोहोणेर - कळवण मार्गावर विठेवाडी - भउर दरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा मोठमोठी काटेरी झुडपे पावसाच्या पाण्याने वाढत चाललेली आहेत. यामुळे रस्त्यावर या काटेरी झुडपांचे अतिक्रमण होताना दिसत आहेत. झाडांच्या फांद्याचा आकार वाढत चालल्याने त्या रस्त्यालगत येत असल्याने वाहन चालकाला अंदाज येत नाही व यामुळे सतत लहान - मोठे अपघात घडत असतात.त्यामुळे ही काटेरी झुडपे काढण्याची मागणी येथील वाहन धारक करीत आहेत.
रस्त्यावर दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे व गवत मोठया प्रमाणात वाढले आहे.या रस्त्याने शेतकऱ्यांचा कांदा विकण्यासाठी ट्रक्टर व वाहनधारकांचा मोठा वापर असून भऊर येथे मका खरेदी होत असल्याने ट्रकद्वारे याच रस्त्याने वाहतूक केली जाते असून काटेरी झुडपे रस्त्यात आल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाही जाण्या येण्यासाठी मुख्य रस्ता आहे.त्यामुळे मोठया प्रमाणात लहान मोठी अवजड वाहने या रस्त्यावरून जात असून वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. तसेच साईड देण्यास जागा शिल्लक राहत नसल्याने अनेक वेळा किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असतात. वणी गडावर जाण्यासाठी किंवा यासह अनेक गावांना जा- ये करत असतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ सुरूच असते.परिणामी वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहनधारकांना अडचणी येत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे.या झुुडपांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील स्थानिक नागरीक व देवळा तालुका राष्ट्रवादी यु.काँग्रेस चे उपाध्यक्ष धनंजय बोरसे यांनी केली आहे.