देवळा-(दि.२५ जुलै) देवळा तालुक्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील हनुमंत पाडा येथे दलित वस्तीत सभामंडपाचे भूमिपूजन व वार्षी प्राथमिक शाळेत संरक्षक भिंतीचे लोकार्पण वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ नूतनताई सुनील आहेर यांच्या हस्ते दि.२४ रोजी करण्यात आले. वार्शी प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, मानव अधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष विलास माळी, केंद्रप्रमुख रावबा मोरे हे उपस्थित होते, सदर कार्यक्रमात येथील अनेक आदिवासी महिलांनी जि. प. सदस्या सौ नूतनताई आहेर यांची भेट घेऊन त्यात त्यांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या त्यात प्रामुख्याने घरकुल लाभ, रेशन कार्ड, आधार कार्ड यात येणाऱ्या अडचणी सांगितल्या त्याचे तात्काळ निरसन करून त्वरित समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन सौ आहेर यांनी उपस्थित आदिवासी महिलांना दिले. यावेळी सरपंच बळीराम वाघ,मा. उपसरपंच विजू नाना सोनवणे, भास्कर माळी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण सोनवणे, पिंटू निरभवणे, खेमराज सोनवणे, परशराम बापू, गोविंद सोनवणे, पो. पाटील योगेश खरे, अंकुश सोनवणे, अमोल सोनवणे, दीपक सोनवणे, काशिनाथ पवार, सुनील सोनवणे, रामदास सोनवणे, गोरख सोनवणे, नाना सोनवणे, राजेंद्र वाघ, सुनील वाघ, जंगलो माळी, प्रकाश निरभवणे, कडू शेवाळे, लखन निरभवणे, रावसिंग वाघ, जीभाऊ माळी, सविता निरभवणे, प्रल्हाद सोनवणे, सुनील निरभवणे, रोशन सोनवणे, कारभारी सोनवणे, शिक्षक किरण पाटील, शालिनी निकम, ठेकेदार सचिन आहेर, अमोल सोनवणे आदी नागरिक उपस्थित होते प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार शिक्षक संदीप पगार यांनी केले.
बातमी व जाहिराती साठी संपर्क : 9765227710 / 7875281316