लोहोणेर - विशेष प्रतिनिधी : " देवळा तालुक्यातील दहीवड येथे बायोसीएनजी व सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पाच्या भुमीपुजन/पायाभरणी आ. डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर हे होते.
दहीवड येथील रामनगर रस्त्यावर दहा एकर जागेत हा प्रकल्प उभा राहत आहे. शेतातील टाकाऊ, कचरा, गिनी गवत यापासून जैविक इंधन, घरगुती गॅस व कंपोस्ट खत अशा स्वरूपात निर्मिती होणार आहे. आपल्या भाषणात जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार असुन अनेक युवकांना या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. हा प्रकल्प तालुक्याच्या लौकिकात भर पडणार आहे.
यावेळी नायब तहसीलदार विजय बनसोडे, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख, तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे, दहीवड चे सरपंच आदिनाथ ठाकरे, सिनियर प्राइम वैभव चव्हाण, शशिकांत पाटील, कंपनी कार्यकारणी सदस्य पुंजाराम देवरे, बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, सोसायटी चेअरमन आर. टी. पगार, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.
कंपनीचे संचालक यशवंत पिंगळे येथील पर्यावरणपुरक इंधन निर्मिती उद्देश आपल्या प्रास्ताविकेतुन केला. आता पर्यंत बारा हजार सदस्य भागदाराक झालेले आहेत. गवताचे बियाणे कंपनी पुरवणार असुन तयार झालेले गवत कंपनी स्वतहा शेतकऱ्यांकडुन विकत घेणार आहे. या गवत, कचर्यापासुन गॅस स्वरुपात जैविक इंधन तयार होणार असल्याचे यांनी सांगितले. सुत्रसंचालन सुनील पवार यांनी तर मयुर पिंगळे यांनी आभार मानले.
बातमी व जाहिराती साठी संपर्क
9765227710 / 7875281316