लोहोणेर : - सटाणा - देवळा - चांदवड या तीन तालुक्यातील प्रमुख गावांना जोडणाऱ्या तसेच← मुंबई - आग्रा ह्या महामार्गला जोडला जाणारा मुख्य रस्ता असलेल्या सोग्रास ते देवळा ह्या रस्त्यावरील पडलेल्या लहान - मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच कळत नाही. खड्डयात पाणी साचल्याने चालकाला अंदाज येत नाही. यामुळे सदर रस्त्यावर सतत लहान मोठे अपघात घडत असतात. सदर रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना कसरत करत या रस्त्यावरून चालावे लागते त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. सोग्रास - देवळा रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. वाहतुकीची च्या दृष्टीने महत्व पूर्ण मानला जाणारा चांदवड - देवळा मतदार संघातील हा रस्ता अत्यंत बिकट होत चालला आहे. सर्वच ठिकाणी खड्डे पाण्याने भरली असल्याने हे खड्डे टाळताना अनेक लहान मोठे अपघात होत असल्याचे समोर येत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी व सदर रस्ता त्वरित सुधारावा करावी अशी मागणी वाहन चालका कडून करण्यात येत आहे.
बातमी व जाहिराती साठी संपर्क :
9765227710 / 7875281316