खर्डे येथे विविध विकास कामांचे जि.प. सदस्या नूतन आहेर यांच्या हस्ते शुभारंभ



देवळा-(दि.२४ जुलै) वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. नूतनताई आहेर यांच्या हस्ते खर्डे येथे मोतींदर वस्ती तळ फरशी पूल, भाजीपाला बाजार आवारात जिल्हा नियोजन वार्षिक आराखड्यातून स्ट्रीट लाईट पोल, खर्डा प्रा. शाळा नवीन दोन वर्गखोल्या यांचे भूमिपूजन तर देवनदी मळा प्रा.शाळा संरक्षक भिंत लोकार्पण असे विविध विकास कामांचे एकाच दिवशी उद्घाटन करण्यात आले. यावेळी खर्डे येथील प्राथमिक शाळेत दि.२३ रोजी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी माजी सरपंच नारायण जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर, ग्रा.पं. प्रशासक प्रशांत पवार, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, अभियंता आर बी चव्हाण उपस्थित होते. खर्डे प्रा.शाळा जुन्या वर्गखोल्यांचे निर्लेखन करण्यात येऊन नवीन वर्गखोल्यांचे साठी निधी उपलब्ध झाला व मोतींदर वस्ती, आदिवासी वस्ती या कडे जाणाऱ्या रस्त्यात पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने ये जा करण्यासाठी नागरिकांची कुचंबना होते तेथेही तळफरशी पूल जि.प. सदस्या सौ. नूतनताई आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी केंद्रप्रमुख रावबा मोरे, माजी उपसरपंच रमेश पवार, निंबा निकम, संदीप पवार, भाऊसाहेब देवरे, रामदास गवारे, काकाजी देवरे, भरत देवरे, ग्रा.पं. सदस्य गोकुळ जगताप, सोमनाथ जगताप, प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव संघटक भाऊसाहेब मोरे, बापू देवरे, समाधान देवरे, गोरख जाधव, बाजीराव मोरे, शशिकांत ठाकरे, सचिन गांगुर्डे, मोहन देवरे, मुन्ना जाधव मुख्याध्यापक के एम मोराणे, ग्राम विकास अधिकारी योगेश पगार, शिक्षक बापू आहेर, नंदू आहेर, उत्तम पगार, संध्या बच्छाव, सुनिता शिरसाठ, तानाजी आहेर, सुमन पवार, ठेकेदार ज्ञानेश्वर देवरे, प्रमोद पवार, ललित निकम, केतन राजभोज, शंतनु पाठक आदी उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार शिक्षिका नयना वाघ यांनी केले.







बातमी व जाहिराती साठी संपर्क :
 9765227710 / 7875281316

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :