सावकीफाटा येथे मॕक्झीमो गाडी च्या धडक दिल्याने एक महिला जागीच ठार


लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - ठेंगोडा येथील सावकी फाटा येथे सावकी रोड लगत भाजीपाला विक्रीसाठी बसलेल्या महिलेला महिद्रां कंपनीची मॕक्झीमो गाडीने धडक दिल्याने येथील सरलाबाई दादाजी अहिरे या जागीच ठार झाले. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सटाणाकडुन - सावकीकडे जाणारी मॕक्झीमो गाडी ( क्रमांक :-  एम.एच.४२ के.५१७ ) या भरधाव वेगात असणारी गाडीने धडक दिल्याने भाजीपाला विक्रीसाठी सावकी रोडच्या बाजुला बसलेल्या सरलाबाई अहिरे ( वय ४१ ) यांना धडक दिल्याने त्या  जागीच ठार झाल्या. अपघातानंतर सदर वाहन चालक तेथुन पळुन गेल्याने या गाडीवरील  चालका विरूद्ध सटाणा पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस निरिक्षक किरण पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस नाईक महाजन , पोलिस अमंलदार विलास मोरे, सांळुंके  हे करत आहेत. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी ठेंगोडा येथे शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. मयत भाजी विक्रेत्या सरलाबाई आहिरे यांच्या अपघाती निधनाने ठेंगोडा गावांत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


       

बातमी व जाहिराती साठी संपर्क
 : 9765227710 / 7875281316

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :