लोहोणेर ( विशेष प्रतिनिधी) : - देवळा तालुक्यातील रामेश्वर येथील चि. सार्थक दत्तु आंबेकर (वय११) हा गुरुवारी पहाटे ५ वाजता गाढ झोपेत असतांना अचानक सर्पदंश झाल्याने बेशुद्ध पडला असता त्यास बेशुद्ध अवस्थेत ग्रामीण रुग्णालय देवळा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी देवळा ग्रामीण रुग्णालयातील वैधकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सार्थक याची गंभीर परिस्थिती ओळखुन क्षणाचाही विलंब न लावता वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश कांबळे व डॉ. निखील पाडवी यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. यावेळी त्याच्या दोन्ही हाताना आय. व्ही. लावण्यात आला. ए.एस.व्ही. (सर्पविरोधी ) लस ची १५ इंजेक्शन्स त्याला देण्यात आली. व निवोस्टीमन औषध व इतर औषध ताबडतोब देण्यात आली.
बाल वयामुळे सार्थकची श्वसनयंत्रणा कमकुवत होत असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. कांबळे यांनी कृत्रिम श्वाससोच्छवास देण्यास सुरुवात केली. त्याला व्हेंटीलेटरची गरज ओळखून मालेगाव सामान्य रुग्णालयात १०८ अॅम्ब्युलन्स ने चालक सुनिल जाधव यांनी श्वाससोच्छवास देत आय. सी. यु. मध्ये दाखल करण्यात आले. आता त्याला सहा दिवसाचा पुर्ण उपचार घेउन पुर्णपणे बरा होउन डिस्चार्ज देण्यात आला. अशावेळी डॉ. कांबळे यांनी दाखविलेले प्रसंगावधान गौरवास्पद आहे.सार्थकला मरणाच्या दारातून देवदूत म्हणून वाचवणारे डॉक्टर व कर्मचारी याना पेशंट सार्थक आंबेकर व त्याची आजी दवाखान्यात खास कांबळे सरांना भेटायला आल्या होत्या. यावेळी ग्रामीण रुग्णालयात पेशंटचा सत्कार करण्यात आला. व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. तसेच पेशंटला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सार्थक च्या सत्काराच्या वेळी डॉ. निखील पाडवी, रवींद्र निकम, प्रविण देवरे, नाना येवला, शिवाजी गांजले, वैशाली कांबळे, प्रतिभा आहेर, अनिता निकम, शशिकांत शिंदे, सुभाष मगर, सुभाष देवरे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
बातमी व जाहिराती साठी संपर्क :
9765227710 / 7875281316