डॉक्टर संपावर जनावरे वाऱ्यावर : पशुपालक करताय स्वत: उपचार

             पशुवैद्यकीय डॉक्टर संपावर असल्याने स्वतहा  उपचार करताना पशुपालक.

लोहोणेर (मनोज देशमुख गेल्या काही दिवसांपासून खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर संपावर गेले  असल्याने लोहोणेर व परिसरातील शेतकरी व पशुपालक यांना उपचारासाठी मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. डॉक्टर संपावर गेल्याने उपचाराअभावी जनावरांचे अतोनात हाल होत आहेत. काही दिवस जर संप असाच चालु राहीला तर बाधीत  जनावरे दगावण्याची शक्यता आहे. यामुळे  बळीराजाला तथा  पशुपालकाला स्वतः उपचारासाठी कसरत करावी लागत आहे.           
                यावर त्वरित तोडगा काढण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या पशुधानाचे हाल होणार नाही. अशी मागणी लोहोणेर येथील पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे.


                




कसमादे मराठी न्यूज  👇


 




बातमी व जाहिराती साठी संपर्क : 9765227710 / 7875281316

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :