राज्यातले कोरोनासाठीचे निर्बंध 15 मेच्या सकाळपर्यंत कायम राहणार याबाबत राज्य सरकारकडून आदेश जारी करण्यात आला आहे.
संपूर्ण महाष्ट्रात दुसरी लाट अत्यंत वेगाने आली असून तिसरी लाट सप्टेंबर किंवा त्या पुढील महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दुसरी लाट संपवण्यासाठी २२ एप्रिल ते १ मे २०२१ पर्यंत लॉकडाउन घोषणा केली होती. परंतु त्याचा २० ते ३५ टक्के ( अंदाजित) फरक पडला असून संपूर्ण राज्यात ६० ते ७५ टक्के (अंदाजित) रुग्ण सक्रीय आहेत. यांचा संपूर्ण विचार-विनिमय करतांना राज्य सरकारने कोरोनासाठीचे लावण्यात आलेले संपूर्ण निर्वंध जसेच्या तसे १५ मे सकाळपर्यंत त्यात कोणताही बद्दल न करता कायम राहतील अशी घोषणा केली.
राज्य मत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत कोविड स्थितीचा आढावा घेण्यात आला होता. यावेळी लॉकडाऊनमुळे काही अंशी रुग्णवाढीला ब्रेक लागला असून आणखी किमान १५ दिवस निर्बंध वाढवावे, असे म्हणणे बहुतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लॉकडाऊन वाढवला जाणार आहे, असे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानुसार आज लॉकडाऊन वाढवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे १५ दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा विचार करा, असे आजच मुंबई हायकोर्टानेही सरकारला सांगितले आहे
तज्ज्ञांच्या मते, या निर्बंधांचा फायदा झाल्याचं दिसून येत आहे. मुंबईत रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. तर, राज्यात रुग्णांची संख्या सरासरी 66 हजारावर स्थिरावलीये.
"मुंबईत अजूनही हर्ड इम्युनिटी (सामूहिक रोगप्रतिकारशक्ती) आलेली नाही. निर्बंध हटवले तर झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव होण्याची शक्यता आहे," असं डॉ. जोशी म्हणतात.
राज्य सरकारने निर्बंध आणखी काही दिवस सुरू ठेवावे? यावर बोलताना कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणतात, "सरकारने निर्बंध हटवले तर मुंबईत रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात निर्बंध कायम राहीले पाहिजेत."
तज्ज्ञांच्या मते, महामारीमध्ये संसर्गाची लाट येत असते. त्यामुळे, राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आरोग्यमंत्री टोपे :
"पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेतून आपण शहाणे झालोय. त्यामुळे संसर्गाचा सामना करताना आपल्याला ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण व्हावं लागेल. औषध, बेड्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या याकडे लक्ष द्यावं लागेल," असं आरोग्यमंत्री पुढे म्हणाले.