LockDown चर्चा : मोठ्या उत्साहात IPL हंगाम सुरु असताना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांचा आज सामना होणार होतो. परंतु कोलकाता नाईट रायडर्स संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (varun chakravarthy) आणि संदीप वॉरियर्स (sandeep warrier) यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
Monday's IPL match between Kolkata Knight Riders and Royal Challengers Bangalore rescheduled after 2 KKR members test positive for COVID-19
— Press Trust of India (@PTI_News) May 3, 2021
चक्रवर्ती नुकताच त्याच्या खांद्याच्या स्कॅनसाठी बायो बबलच्या बाहेर गेला होता. त्याच वेळी कोरोनाने त्याला गाठलं असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरुण चक्रवर्ती आणि वॉरियर वगळता केकेआरचे बाकीचे खेळाडू ठीक आहेत. त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आहेत.
ऑस्ट्रेलियन वेबसाइट द एजच्या रिपोर्टनुसार कोलकाता नाइट रायडर्सचे बरेच खेळाडू आजारी पडले आहेत. अशा परिस्थितीत उर्वरित खेळाडू आणि कर्मचारी आयसोलेट आहेत. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आजारी पडलेल्या खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचे नावही आहे.
Tonight’s game off in IPL. Player in Pat Cummins KKR tests positive. Nightmare. Story being posted on @australian website as I tweet with more details
— Peter Lalor (@plalor) May 3, 2021