कांचने पाणी पुरवठा योजनेसाठी जि.प.सदस्या यांचा जागा पाहणी दौरा

Top Post Ad

देवळा-दि. (९जुलै) कांचने पाणी पुरवठा योजनेची जि.प.सदस्या नूतन आहेर यांनी पाहणी केली. महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद अंतर्गत जल जीवन मिशन या महत्त्वकांक्षी पाणी पुरवठा योजनेच्या कृतीआराखड्यात वाखारी जि. प. गटातील ८ गावांचा समावेश झाला असून त्यात कांचने गावाचा देखील समावेश करण्यात आल्याने येथील रहिवाशांसाठी ही योजना वरदान ठरणार असून गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागणार असल्याने सदर योजना लवकरात लवकर कार्यान्वयित व्हावी यासाठी जि. प. सदस्या नूतन आहेर यांनी पाणीपुरवठा करणाऱ्या   उदभव विहिरीसाठी जागेची पाहणी केली व उपस्थित नागरिकांशी चर्चा केली यावेळी   सुनील आहेर, सरपंच चंद्रकला गांगुर्डे, उपसरपंच ऍड. तुषार शिंदे, माजी उपसरपंच माणिक बापू शिंदे, जिभाऊ हेंबाडे, भास्कर शिंदे, बापू आघाव, नामदेव हेंबाडे, शिवाजी पवार, ग्रा. पं. सदस्य श्रावण पवार, शिवाजी पवार, पोलीस पाटील दिगंबर सोनवणे, संजय जाधव, तानाजी फुगट, रामदास हेंबाडे, महेंद्र आघाव, भूषण हेंबाडे, बबन शिंदे, संजय शिंदे, सतीश पवार, देविदास पवार, रवी हेंबाडे, समाधान हेंबाडे, वाल्मीक गांगुर्डे, बापू पवार, शरद पवार, प्रकाश शिंदे, सोनू शिंदे आदी उपस्थित होते.


Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.