नायब तहसीलदार यांना निवेदन देताना अविनाश महाजन, सुभाष बच्छाव, व संजय नाना धोंडगे आदि.
लोहोणेर (मनोज देशमुख) : शासनाने कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता महाराष्ट्रातील मंदिर बंद केली आहेत. मात्र एकीकडे बाजारपेठा खुल्या आहेत, लग्न, समारंभ आदी सोहळे शेकडोंच्या गर्दीने चालू आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे..सर्व धार्मिक कार्यक्रमांना शासनाने परवानगी द्यावी, मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी द्यावी आणि परिसरातल्या प्रवचन,किर्तन सप्ताहांना परवानगी द्यावी. या आशयाचे निवेदन नायब तहसीलदार गायकवाड यांना वारकरी महामंडळाचे तालुकाध्यक्ष अविनाश दादा महाजन,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बच्छाव, जिल्हा मार्गदर्शक संजय नाना धोंडगे, तात्याभाऊ सावंत,काका शिंदे यांनी दिले.
मा. नायब तहसीलदार यांना निवेदन दिलेले पत्र
शासनाने मंदीरे चालु करावीत, भजन कीर्तन, सप्ताह यांना परवानगी द्यावी त्यासाठी करोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व वारकरी शासनाचे नियम पाळतील.
- ह.भ.प.अविनाश दादा महाजन तालुकाध्यक्ष देवळा (महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ)