मा. राहुल आहेर यांच्या संकल्पनेतून : "संत पूजन सोहळा"




लोहोणेर (पंडित पाठक) : - आज आषाढी एकादशी निमित्त तसेच कोरोना महामारीमूळे 2 वर्षा पासून वारी होत नसल्याने आमदार डॉ.राहुल दौलतराव आहेर यांच्या संकल्पनेतून  "संत पूजन सोहळा" आयोजित करण्यात आला होता.  यात चांदवड व देवळा तालुक्यातील  वारकरी  किर्तनकार यांचा पूजन व सत्कार सोहळा आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांच्या हस्ते पांडुरंगाची मूर्ती, तुळशीमाळ, बुक्का, गंधगोळी, वारकरी उपरणे देऊन करण्यात आला.तसेच गेल्या पाच दिवसांपासून  ऑनलाइन प्रवचन ठेवण्यात आले होते.यामुळे संतांचे विचार घरबसल्या नागरिकांपर्यंत गेले.यालाही मोठा प्रतिसाद चांदवड देवळा तालुक्यात मिळाला.
     सदर कार्यक्रमास देवरगाव येथील सुजित महाराज, ह.भ.प.तुकाराम महाराज निकम, ह.भ.प.माधव महाराज शिंदे, ह.भ.प.संजयनाना धोंडगे, ह.भ.प.मधुकर महाराज जाधव, ह.भ.प.शिवाजी महाराज आहेर, ह.भ.प.नामदेव महाराज ठाकूर, ह.भ.प.निवृत्ती बाबा काळे, यांच्या सह दोन्ही तालुक्यातील बहुसंख्य कीर्तनकार उपस्थित होते. ह.भ.प नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी प्रास्ताविक तर ह.भ.प.सौरभ महाराज यांनी सुत्रसंचलन करून सर्वांचे आभार मानले.



कसमादे मराठी न्यूज  👇


 





 


    बातमी व जाहिराती साठी संपर्क : 9765227710 / 7875281316

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :