परंतु नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची कोरोनाची संपूर्ण परिस्थीती ओळखून डिसेंबर 2020 पासून नियोजनास सुरुवात केली. संपूर्ण जिल्ह्याचे नियोजन करता संपूर्ण गावातील सर्वे असो, अडचणीच्या काळात लागणाऱ्या रुग्णवाहिका यांची उपलब्धता करून ठेवली त्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांचा आढावा घेऊन ऑक्सिजन, बेड व रेमडेसिवीर सारखे अत्यंत उपयुक्त ठरणारे औषधे यांचा तुटवडा भासणार नाही याची मोठ्या प्रमाणत काळजी घेतली.
हे सर्व करतांना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी आपल्या (आदिवासी बहुल म्हणून ओळख) नंदुरबार जिल्ह्याला सुरक्षित ठेवले आहे. त्यांनी केलेल्या नियोजनाबद्दल संपूर्ण स्तरातून कौतुक व स्वत: राज्याचे आरोग्यमंत्री यांची त्यांचे अभिनंदन करून संपूर्ण राज्यात नंदुरबार पॅटर्ण राबवण्यात येणार आहे. अशी माहिती दिली.