दिवसेंदिवस उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढत असताना सर्वच वयोगटातील मुले, नागरिक फळे खाण्यास पसंती देतात. तसेच त्या पलीकडे जाऊन ICE-CREAM व रसवंती कडे सर्वांचा कल असतो. परंतु या पलीकडे जाता तुम्ही खालील फळांचे सेवन केले तर तुम्हाला खालील फायदे होतील.
कलिंगड
"फळांचा राजा'' आंबा :
उन्हाळ्यात येणारे सर्वात लोकप्रिय फळ म्हणजे आंबा. "फळांचा राजा' ही उपाधी लाभलेल्या या फळामुळे उन्हाळा सुसह्य तर होतोच, शिवाय उन्हाळ्यातील उष्णता आंबा पचविण्यास मदत करते.
पक्वमात्रं जयेद्वायुं मांसशुक्रबलप्रदम् ।...चरक सूत्रस्थान
पिकलेला आंबा वातदोषाला जिंकतो, मांसधातू तसेच शुक्रधातूची ताकद वाढवतो, एकंदर शरीरशक्तीही वाढवतो.
पिकलेला आंबा तास-दोन तास साध्या पाण्यात बुडवून ठेवावा व नंतर त्याचा रस काढून, दोन चमचे साजूक तूप, एक-दोन चिमूट मिऱ्याची पूड, सुंठीचे चूर्ण टाकून दुपारच्या जेवणात घ्यावा. यामुळे उन्हाळ्यामुळे वाढणारी रुक्षता आटोक्यात राहते, रक्तादी धातूंचे पोषण होते, उन्हाळ्यामुळे कोमेजलेल्या चित्तवृत्ती पुन्हा उल्हसित होतात. मधुमेहाच्या रुग्णांनी, वजन जास्ती असलेल्या व्यक्तींनी मात्र वैद्यांच्या सल्ल्याशिवाय आंबा खाऊ नये.
संत्री :
रससशीत मोसंब खा आणि निरोगी रहा कारण संत्री - मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे.
मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे.
मोसंबी सौंदर्यवर्धक आहे. मोसंबी पौष्टिक, मधुर, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, दीपक, हृदयास उत्तेजना देणारी, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे.
मोसंबीच्या सालीतून सुगंधी तेल प्राप्त होते.
सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी, अन्नपदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात.
मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो.
मोसंबीची ताजी साल चेहर्यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे. मोसंबाची सालही वातहारक असते.
काकडी :
- भूक मंद झाली असेल तर काकडीचे काप करून पुदिना, काळे मीठ, लिंबू रस, मिरे व जिरेपूड घालून खावेत. यामुळे भूक चांगली लागते.
- चेहऱ्याचा टवटवीतपणा आणि सौंदर्य वाढवण्यासाठी काकडीचा रस व मध यांचे मिश्रण चेहऱ्यास हलक्या हाताने चोळून लावावे.
- निद्रानाश ही समस्या भेडसावत असेल तर काकडीचे काप डोक्यावर ठेवून झोपावे.
- डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी काकडी आणि बटाटे कुस्करून एकत्र करून डोळ्यांभोवती दररोज लावावा. सुकल्यानंतर तो धुऊन टाकावा.
- हऱ्यावरील वांग व काळपटपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस, लिंबुरस व दूध एकत्र करून कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावावे व हलक्या हाताने मसाज करावा.
- शरीरावरील भाजलेल्या जखमेची आग होत असेल तर काकडीचा रस लावावा, यामुळे तेथील आग थांबते.
- मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या हातापायांची अनेक वेळा जळजळ होत असते, अशा वेळी काकडीचे काप तळहातावर व तळपायावर चोळावेत.
- काकडी ही शीतल व सारक आहे. त्यामुळे मलावष्टंभाची तक्रार असणाऱ्या रुग्णांनी रोज काकडीचे सेवन करावे. यामुळे आतडय़ातील मळ पुढे ढकलण्यास मदत होते व पोट साफ होते.
- काकडी, गाजर, बीट व कोिथबीर यांचा रस एकत्र करून प्यायल्यास शरीरातील उष्णता कमी होते व उत्साह निर्माण होतो. तसेच शरीरात युरिक अॅसिड साठून होणारे गाऊट, आर्थोरायटिस व सांधेदुखी यांसारखे रोग दूर होतात.