लोहोणेर (मनोज देशमुख) :- सालाबादाप्रमाणे आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सुमारे पहाटे पाच वाजता विठ्ठल - रुक्मिणी मुर्तीस वेदमुर्ती भुषण पाठक यांच्या मंत्रघोषात पंडित नाना पाठक यांच्या हस्ते अभिषेक व महापुजा करण्यात आली. सायंकाळी संपूर्ण गावातुन टाळ मृदुंगाच्या गजरात भजनी मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने पांडुरंगाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. पंढरीनाथ महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच कोरोणाचे नियमाच भान राखून पांडुरंगाचे भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
बातमी व जाहिराती साठी संपर्क :
9765227710 / 7875281316