लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - येथील शेतकरी मनोहर गोपाळा शेवाळे यांचा एकुलता एक चिरंजीव जितेंद्र मनोहर शेवाळे ( वय २९ ) या अविवाहित तरुणाने आपल्या शेजारच्या पडीत झाप मध्ये दोरखंडाने फाशी घेऊन आत्महत्या केली. या संदर्भात देवळा पोलिसांत अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून पी.आर.राठोड हे पुढील तपास करीत आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी की, लोहोणेर - खालप रस्त्या वरील खारोटे शिवार येथील शेतकरी मनोहर गोपाळा शेवाळे हे आपल्या कुटूंबियां समवेत कांदा चाळीत कांद्याचे ट्रॅक्टर भरत असतांना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मनोहर शेवाळे यांचा एकुलता एक मुलगा जितेंद्र मनोहर शेवाळे ( वय २९) या तरुणाने आपल्या मळ्यातील घराचे शेजारील सध्या पडीत अवस्थेत असलेल्या मधुकर केदा शेवाळे यांच्या मालकीच्या पाचटाचे झापात दोरखंडाने फाशी घेऊन आत्महत्या केली. या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्या चे निश्चित कारण मात्र समजले नाही. या संदर्भात देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. मयत जितेंद्र शेवाळे याच्या निधनाने लोहोणेर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
बातमी व जाहिराती साठी संपर्क :
8390172101 / 9765227710 / 7875281316
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/DrMh1FvmNNu66MyowfFXov
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig