Maharashtra Board HSC Result 2021: उद्या दुपारी 4 वाजता जाहीर होणार महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वी चा निकाल; जाणून घ्या कुठे पाहू शकाल व निकालाचा फॉर्म्युला...


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत 2021 मध्ये उच्च माध्यमिक 12 परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार, अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल.

▶️अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे-



▶️बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला नेमका काय?
महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.

▶️ निकाल कसा जाहीर करणार?
शासन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) मधील मूल्यमापन तसेच इयत्ता 11 वी व इयत्ता 12 वी मध्ये वर्षभरातील कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील विविध मूल्यमापन साधनांद्वारे करण्यात आलेल्या मूल्यमापनाच्या आधारे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) सन 2021 चा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेत आहे. ही अपवादात्मक परिस्थितीतील सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठीची तात्पुरती व्यवस्था आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (इयत्ता 12 वी) निकाल तयार करण्यासाठी निश्चित कार्यपद्धती अवलंबण्यात येणार आहे.

▶️ 12 वी निकालाची कार्यपद्धती
शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी ) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता 10 वी व इयत्ता 11 वी या दोन्ही इयत्तांसाठी संपादणूकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील विविध भागातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये या स्थानिक परिस्थितीमुळे एकाचवेळी सुरू होऊ शकल्या नाहीत. तसेच राज्यातील सर्वच उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता 12 वीच्या मूल्यमापन प्रक्रियेतील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, सर्वच परीक्षा घेण्यात आल्या आहेतच असे नाही. त्यामुळे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा सन 2021 साठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येईल. हे करताना शासन निर्णय 08 ऑगस्ट 2019 मधील विषयनिहाय लेखी व तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन यासाठी निर्धारित केलेले गुण कायम ठेवण्यात यावेत. त्यातील तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन यासाठी मंडळाच्या सूचनांप्रमाणे आयोजित परीक्षांमध्ये विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले गुण अंतिम मूल्यमापनात घेण्यात येणार आहेत. गुण विभागणी तोंडी/प्रात्यक्षिक/ लेखी विषय विषय द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रम व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) व्यवसाय अभ्यासक्रम अंतर्भुत आहे.

▶️ निकालातील गुणांची विभागणी कशी?
विद्यार्थ्याची इ.10 वी मधील मंडळाच्या परीक्षेतील संपादणूक,  इयत्ता 11 वी च्या अंतिम निकालातील संपादणूक व इयत्ता 12 वी चे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन विचारात घेऊन निश्चित करण्यात येतील. उपरोक्तप्रमाणे लेखी परीक्षेसाठी निर्धारित एकूण गुणांपैकी 30 टक्के गुण इयत्ता 10 वी मधील मंडळाच्या परीक्षेतील संपादणूक, 30 टक्के गुण इ. 11 वी च्या अंतिम निकालातील संपादणूक व 40 टक्के गुण इयत्ता 12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन यानुसार भारांश विचारात घेऊन दिले जातील. इयत्ता 10 वी साठी भारांशानुसार प्राप्त गुण निश्चित करताना मंडळाच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण असलेले तीन विषय विचारात घेतले जातील.
इयत्ता 12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण लक्षात घेतले जातील.
उच्च माध्यमिक शाळांनी/ कनिष्ठ महाविद्यालयाने विषयनिहाय मंजूर आराखडयानुसार वर्षभर ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या वा तत्सम मूल्यमापन केलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्राप्त झालेले गुण तसेच सदर गुण किती पैकी आहेत सदर विषयासाठी एकूण किती गुणांचे अंतर्गत मूल्यमापन आयोजित केले आहे
तोंडी परीक्षा, मुल्यमापन आणि प्रात्यक्षिक परीक्षेचं काय?
विषयनिहाय प्राप्त गुण संगणक प्रणालीत सदर गुणांचे संगणक प्रणालीमधून रूपांतर करून सदर गुण विद्यार्थ्यास संगणक प्रणालीद्वारे प्रदान केले जातील. मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्यास इयत्ता 12 वीच्या अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा/ अंतर्गत मूल्यमापन यामध्ये प्रत्यक्ष प्राप्त झालेले गुण अंतिम निकालात समाविष्ठ करणे. ज्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विषयनिहाय मंजूर आराखडयानुसार तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापन पूर्ण केलेले आहे.




बातमी व जाहिराती साठी संपर्क : 
8390172101 / 9765227710 / 7875281316

कसमादे मराठी न्यूज  👇


 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :