वादळी वाऱ्याने सावकी परिसरात मोठे नुकसान


लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - आज सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळ व पावसामुळे देवळा तालुक्यातील सावकी परिसरात दाणादाण उडाली असून मोठमोठे आंब्याची झाडे जागोजागी उन्मळून पडली असून मका पीक भुईसपाट झाले आहे तर काही शेडची पत्रे उडाली आहेत तर काही ठिकाणी विद्युत पोल कानी झाले असल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. आज सायंकाळी लोहोणेर , ठेंगोडा, सावकी विठेवाडी परिसरात पावसाने हजेरी लावली मात्र सावकी परिसरात मात्र वादळाने रौद्ररूप धारण केल्याने सर्वत्र विजेचा कडकडाट व जोरदार वादळी वाऱ्याने मोठमोठे झाडे अक्षरशः उन्मळून पडली.तर काही ठिकाणी विद्युत पोल वाऱ्यामुळे कानी झाले. या वादळी वाऱ्या बरोबर जोरदार पावसाने आपली हजेरी लावली. यामुळे मका पीक जमीनदोस्त झाले. यामुळे परिसरातील बळीराजा चांगलाच धास्तावला असून आजच्या अस्मानी संकटाने त्याच्या काळजीत भर पडली आहे. अचानक आलेल्या या वादळी संकटाने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.


 
   




---------------------------------------------------

            


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :