लोहोणेर जनता विद्यालयाचे शिक्षका कडून विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : -- येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मास्कचे वाटप करण्यात आले. विद्यालयाचे शिक्षक व्ही. डी. जाधव व एस. एस. सावंत यांनी गरीब,होतकरू व ज्यांच्याकडे एकच मास्क आहे. अशा गरजू विद्यार्थ्यांना ह्या मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी लोहोणेर ग्रामपंचायतीच्या सरपंच पूनम पवार, मुख्याध्यापक वाय.यु.बैरागी, पर्यवेक्षक बी. के. जाधव व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी जनता विद्यालयाचे उपशिक्षक राकेश थोरात यांना सटाणा नगरपरिषद आयोजित आदर्श शिक्षक पुरस्काराचे उत्कृष्ठ व प्रभावी सूत्रसंचालन केल्याबद्दल उत्कृष्ठ निवेदक पुरस्कार मिळाल्याने विद्यालयाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर सेवक वृंद उपस्थित होते.

-----------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :