देवळा पोलीस स्टेशन च्या समोर असलेल्या नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह...

देवळा प्रतिनिधी - देवळा पोलीस स्टेशन च्या समोर असलेल्या नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असून , सदर इसमाच्या उजव्या हातावर अल्काबाई संजय माळी असे नाव गोंदलेले आहे. तसेच ,उजव्या हातात सफेद धातूचे कडे, अंगात लाल मळलेला टी शर्ट, सफेद रंगाची जीन्स , डोक्यावर सफेद केस, दाढी मिशी वाढलेली अशा प्रकारे वर्णन 
असलेल्या इसमाचा मृतदेह आढळून आला. देवळा पोलीस ठाण्या समोरील नदी तील बाजार पट्टी मध्ये सदर अज्ञात इसमाचा मृतदेह अदांजे ६५ ते ७० वयाचा आहे. तरी कोणाला सदर इसमाची ओळख पटल्यास देवळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :