लोहोणेर येथे महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या पंचायत राज समिती पथकाची भेट..
0
August 27, 2021
लोहोणेर (पंडित पाठक) : - महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या पंचायत राज समितीच्या पथकाने आज सायंकाळी लोहोणेर येथे भेट देऊन गावात झालेल्या विविध विकास कामाची पाहणी केली. लोहोणेर गावांतील रस्ते कॉन्क्रीटी करणं, घरकुल योजना, व आदिवासी वस्तीतील नळ पाणी पुरवठा योजना आदी कामांची पाहणी केली. दरम्यान पंचायत राज समितीच्या पथकाने लोहोणेर येथील पशुसंवर्धन केंद्रास भेट देऊन पाहणी केली. या दरम्यान सदर समितीने येथील आदिवासी वस्तीमध्ये झालेल्या रमाई घरकुल योजनेच्या काही निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तर ग्रामपंचायत कार्यालया समोरील तीन वर्षां पूर्वी झालेल्या कॉन्क्रीटी करणाची तपासणी केली असता सदर रस्ता उखडल्याने सदर पथकाने नाराजी व्यक्त केली. या पथकात आ.प्रशांत बंब, आ .अंबादास दानवे, आ.रत्नाकर गुटे,विधिमंडळ अधिकारी तथा जिल्हा परिषद प्रशासकीय अधिकारी दीपक चाटे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास),प्रतिवेधक गजानन बोरले, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष मांडगे, कृषी अधिकारी प्रशांत पवार, जयवंत भामरे( विस्तार अधिकारी), उप अभियंता वाणी, एस.जे.पगार, आर.बी.चव्हाण, ठाकरे आदी अधिकारी वर्ग, तसेच लोहोणेर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यु.बी.खैरनार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. लोहोणेर येथे गेल्या तीन वर्षा पूर्वीच्या घरकुल बांधकाम बाबत सदर पथकाने प्रत्यक्ष लाभार्थीची भेट घेतली व निकृष्ट दर्जाचे कामकाजा बाबत उघड उघड नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.