या कार्यक्रमास ग्रामसेवक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निकम सर, पर्यवेक्षीका सौ. के.एस. चव्हाण.आरोग्य सेविका मोहन सिस्टर,आशासेविका,अंगणवाडी सेविका -सौ.पुष्पा शेवाळे ,सुनिता शेवाळे ,मीनाक्षी जाधव,सुनिता सोनवणे, सुनिता हिरे,भारती जाधव सर्व अंगणवाडी मदतनीस ,गरोदर माता,स्तनदा माता,किशोरी मुली लाभार्थी,पालक आदी उपस्थीत होते. उपस्थित सर्व लाभार्थींना पोषण आहार व आरोग्या संदर्भात डॉक्टर,आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका यांनी मार्गदर्शन केले.
लोहोणेर येथे राष्ट्रीय पोषण आहार निमित्ताने विविध उपक्रम व वृक्षारोपण...
0
September 02, 2021
लोहोणेर - राष्ट्रीय पोषण आहार निमित्ताने संपूर्ण राज्यभर कुपोषणावर मात करण्यासाठी 'पोषण माह' मध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पोषण महिन्या मध्ये अंगणवाडी सेविका,मदतनीस पर्यवेक्षिका,आशा वर्कर्स,यांची भुमिका महत्वाची आहे. याचाच एक भाग म्हणून लोहोणेर येथे पहिल्या दिवशी रॅली काढण्यात आली. आणि आज ही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यात इंदिरानगर, राममंदिर, कोळीवाडा, खालपफाटा, नवामळा लोहोणेर - ९ आदी अंगणवाडी केंद्र सहभागी होत्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लोहोणेर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. पुनम योगेश पवार व पंचायत समितीच्या सदस्या श्रीमती कल्पनाताई आबासाहेब देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.