लोहोणेर - भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा ज्या, त्या गावांना अभिमान असतो. देवळा तालुक्यातील खर्डे (वा) गावाच्या वतीने गुरुवारी ( दि २) रोजी भारतीय सैन्य दलाच्या ११३ वी बटालियन मध्ये २० वर्षांच्या खडतर सेवेनंतर संदीप देवरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले . सेवानिवृत्त सैनिक संदीप देवरे यांचा सन्मान करण्यासाठी गावातील नागरिक उपस्थित होते. ग्रामस्थांनी या गावाच्या वीर सुपुत्राची जंगी स्वागत करुन घोड्यावरून वाजत-गाजत मिरवणूक काढली. गावचे सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा आदर्श नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा, या हेतूने निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्याचे खर्डे ग्रामस्थांनी ठरविले होते.
या कार्यक्रमास माजी सैनिक दौलत भामरे, बाबुराव चव्हाण आदिंसह प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, शिवसेनेचे विभाग प्रमुख विजय जगताप, माजी उपसरपंच काकाजी देवरे, कृषी सहायक शिवाजी आहेर , कारभारी पवार, भिला देवरे, भाऊसाहेब देवरे, भाऊसाहेब मोरे, कारभारी जाधव, संदीप पवार, नानाजी गांगुर्डे, संदीप जाधव,त्रम्बक देवरे, बाळासाहेब मोरे,बिठोबा मोरे,नानाजी मोरे ,कडू मोरे, बापू पवार, नितीन देवरे, बंडू देवरे ,दौलत देवरे,रामदास बिरारी ,मुन्ना पवार ,बापू देवरे आदि उपस्थित होते.
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig