अवैध दारू विक्रीबाबत भउर येथील महिला आक्रमक : एकत्र येत केली अवैद दारू विक्री बंद

लोहोणेर - देवळा तालुक्यातील भऊर येथील बोदाडी वस्ती येथील आदिवासी महिलांनी एकत्र येत या वस्तीवरील अवैद्य दारू विक्री बंदी केली. आदिवासी महिलांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, याच प्रमाणे भऊर गाव, नेपाळी वस्ती तसेच इतर वस्त्यांवर होणारी दारू विक्रीही बंद करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. गावांमधील तरुण मुलं दारूसारख्या वाईट व्यसनाच्या आहारी जात आहेत, अनेकांचे संसार या दारूपायी उध्वस्त झाले आहेत. या गोष्टीना आळा बसावा म्हणून ऑगस्ट महिन्यात गावातील काही सुजाण नागरिकांनी भऊर गाव आदिवासी वस्ती, नेपाळी वस्ती, बोदाडी वस्ती आदी परिसरातील स्थानिक नागरिकांच्या त्या-त्या ठिकाणी एकत्र करत दारूबंदीबाबत बैठक झाली होती. यावेळी अवैद्य दारू बंदीबाबत चर्चा करून दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. १५ ऑगस्टनंतर पूर्णपणे बंदी, असा निर्णय झालेला असतानादेखील या परिसरात सर्रास दारूविक्री होत आहे. याबाबत बोदाडी वस्ती येथील स्थानिक आदिवासी महिलांनी आक्रमक होत आज या वस्तीवर होणाऱ्या दारूविक्रीला विरोध केला. विक्री होत असलेली दारू जप्त करून जमीनीवर ओतून यावेळी नष्ट करण्यात आली व पुढील काळात जर कुणी दारू विक्री करतांना दिसून आले तर स्थानिक महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, आज सजड दम या महिलांनी दिला.
दोन वर्षांपूर्वीचा ठराव कागदावरच
१४ ऑगस्ट २०१९ रोजी तालुक्यातील भऊर येथील ग्रामसभेत गावातील महिलांनी आक्रमक होत गावातील अवैद्य दारू विक्रीबाबत आक्रमक पवित्रा घेत दारूबंदीचा ठरावा केला होता. मात्र या गोष्टीला कुठलाही सकारात्मक प्रतिसाद लाभला नाही. पोलीस प्रशासन किंवा स्थानिक दारूबंदी कमिटीने आवश्यक असे ठोस पाऊल उचललेले या मागील काळात दिसून आले नाहीत. दारूबंदी ठरावा हा फक्त कागदावरच घर करून होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :