जि.प.सदस्या सौ.नुतनताई सुनिल आहेर यांना नेल्सन मंडेला अमेरिका विद्यापीठा कडुन डॉक्टरेट पदवी..

देवळा- सन्मान एक पवित्र वैचारिक, शैक्षणिक, सामाजिक चळवळीचा पक्षाला मर्यादा असू शकतात. परंतु विचाराला कुठलीही मर्यादा असू शकत नाही. अशाच समविचाराच्या धाग्याने जुळलेले, अष्ठपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आदर्श महिला, वाखारी तालुका देवळा जिल्हा परिषद गटातील जि. प. सदस्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या, समाजातील व सर्व घटकातील प्रतेक व्यक्तीच्या मनामनात घर केलेल्या, मिञ परिवार यांच्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या अनेक विवाहितांना योग्य ते मार्गदर्शन व मदत करुन त्यांच्या जीवनामध्ये बदल घडविनारे , संसाराची गाडी सुरळीत करणाऱ्या सौ. आहेर यांना राजकीय, सामाजिक, प्रशासन, व ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल नेल्सन मंडेला विद्यापीठ अमेरिका यांचेकडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना गौरविण्यात आले आहे, अहमदाबाद (गुजरात) येथे मा. प्रल्हादजी दामोदरदास मोदी, केंद्रीय मंत्री मा. रामदासजी आठवले साहेब , प्रसिद्ध गायक उदित नारायण व इतर मान्यवरांच्या हस्ते सौ नूतन ताई यांना डॉक्टरेट हा बहुमान प्रदान करण्यात आला .तरी त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :