लोहोणेर येथे पाण्याच्या शोधात भटकंती करणारा बिबट्या पडला विहिरीत

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - येथील प्रगतीशील शेतकरी कमलाकर रघुनाथ नेरकर यांच्या मळ्यातील विहिरीत आज सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान आढळल्याने सर्वत्र भीती व्यक्त केली जात आहे. बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वन विभागाच्या वतीने शर्तीचे प्रयत्न करून रात्री उशिरापर्यंत बिबट्याला विहिरी तुन बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू  होते. गर्दी हटविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याना बोलविण्यात आले. लोहोणेर येथील प्रगतीशील शेतकरी कमलाकर नेरकर यांच्या मळ्यातील गट नंबर ९९२ मध्ये घरालगत विहीर आहे. नेरकर हे सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान विद्युत पंप बंद करण्यासाठी विहिरीजवळ गेले असता विहिरीत बिबट्या पडला असल्याचे प्रथम दर्शनी च्या लक्षात आल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. बिबट्या ची वार्ता वाऱ्या सारखी गावात पसरताच बघ्यानी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सदर गर्दी हटविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले. वन विभागाच्या वतीने रात्री उशिरापर्यंत बिबट्याला विहिरीतुन बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :