दाभाडी येथे बैलपोळा निमित्ताने बैलांची आकर्षक स्पर्धा: आयोजक शेतकरी राजा मित्रपरिवार.
0Pandit PathakSeptember 08, 2021
मालेगाव (दाभाडी) -दाभाडी येथे बैलपोळा सणाच्या निमित्ताने बैलांची आकर्षण सजावट स्पर्धा आयोजित करण्यात होती. स्पर्धेतील आकर्षक बैल जोडी मालकांनी आपआपली बैल जोडीआकर्षकरीत्या सजवली होती.दोद्याड नदीजवळील महादेव मंदिराजवळ बैल पोळ्यास प्रारंभ झाला. शेतकरी राजा मित्रपरिवाराने बैलपोळा निमित्ताने या बैलांची आकर्षक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील आकर्षक बैल जोडी मालकांचा कृषी मंत्री मा.दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. या ठिकाणी मानाच्या बैलांची विधीवत पूजा करण्यात आली त्यानंतर ग्रामदैवत हनुमान मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी पंच आकर्षक बैलांचे निरीक्षण करून नोंद करीत होते. शंभराहून अधिक बैलजोड्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. तसेच नाफेड व महाराज्य ग्रुपच्या वतीने आकर्षक बैलजोडी मालकांना मोफत कांदा बियाणे वाटप करण्यात आले. कृषी मंत्री भुसे यांच्या हस्ते सपत्नीक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सोनाली निकम,सिड्स मॅनेजर डॉ डी.पी.सिंग , महाराज्य ग्रुपचे चेअरमन सुरेश पवार गणेश पवार ब्रांच मॅनेजर शैलेंद्र कुमार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कृषी मंत्री दादा भुसे व पंचायत समितीचे माजी सभापती शशिकांत निकम यांनी मनोगत व्यक्त केले प्रस्तावित कुणाल निकम यांनी केले तर सूत्रसंचालन शेखर निकम यांनी केले. तसेच शेतकरी राजा मित्रपरिवार, शिवसैनिक ,युवा सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.