आरोग्य अधिकारी डॉ.सुधीर पाटील यांनी घेतली वाखारवाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भेट.

देवळा तालुका कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना तालुक्यातील वाखारवाडी येथे आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ . सुधीर पाटील यांनी भेट देत या रुग्णांना गृह वीलगिकरणात राहण्याचा सल्ला देऊन घराबाहेर न पडता आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. वाखारवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भेट घेऊन विचारपूस करतांना आरोग्य अधिकारी डॉ . सुधीर पाटील ,समवेत वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष कुमार आडे ,विस्तार अधिकारी राजेश निकुंभ  नवनियुक्त तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुधीर पाटील यांनी तालुक्यातील वाखारवाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भेट घेऊन येथील वाखारी उपकेंद्रला तसेच कोविड लसिकरण केंद्राला भेट देऊन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले . त्यांच्या समवेत वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कुमार आडे, विस्तार अधिकारी राजेश निकुंभ उपस्थित होते  वाखारवाडी येथे एकाच कुटुंबात पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासन व गावकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. याठिकाणी एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झाली असून, संपूर्ण तालुक्यात एकूण अकरा रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तर जिल्ह्यात रूग्णांची संख्या शंभरी पार झालेली आहे.तालुक्यातील अकरा एक्टीव रुग्णांपैकी तीन जण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. उर्वरित बधितांना आरोग्य विभागाने घराबाहेर न पडता गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात येऊन, काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. एकीकडे तालुका कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असतांना एकाच गावात आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची धावळप उडाली .
तालुक्यात लसीकरण मोहीम सुरळीत सुरू असून, याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जवळपास ६० टक्के लसीकरण झाले असून, लवकरच तालुक्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल असा विश्वास आरोग्य विभागाने यावेळी व्यक्त केला . तालुक्यात मुबलक प्रमाणात लस साठा उपलब्ध होत असून, आरोग्य केंद्रांतर्गत गाव निहाय सुरळीत वितरण करण्यात येत आहे. याचा संबंधित नागरिकांनी लाभ घ्यावा.तसेच कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ सुधीर पाटील यांनी केले आहे.
कोरोना रुग्णांची घटती संख्या लक्षात घेऊन सर्वत्र अनलॉक झाले आहे. शासनाने बहुतांश निर्बंध शितील केल्याने शहरासह ग्रामीण भागात गर्दीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात (दि ८) रोजी नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येने शंभरी पार केल्याने पुन्हा धास्ती वाढली आहे. कोरोनाची भीती अजून संपली नसून, नागरिकांनी येणाऱ्या सण उत्सवात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे , सामाजिक अंतर राखणे , मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा शासनाने लागू केलेल्या अटी व शर्तींचे पालन करून, प्रशासनास सहकार्य करावे ,असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :