माजी आमदार शंकर आहीरे यांचे निधन.
0
September 09, 2021
बागलान विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शंकर दौलत आहिरे वय(८५)यांचे मंगळवारी( ता.०७) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. बुधवारी(ता.०८) महालपाटणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगी, जावई, नात, नातू असा परिवार आहे. १९९९- २००४ दरम्यान बागलाण चे आमदार होते. "शंकर आप्पा" म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. तत्कालीन मंत्री डॉ. दौलतराव आहेर जिल्ह्यातील हेवीवेट नेते होते . कसमादे त्यांची कर्मभूमी असल्याने या भागावर आपले वर्चस्व असावे असे त्यांना नेहमी वाटे. मात्र भाजपला सक्षम उमेदवार मिळत नसल्यामुळे त्यावेळी महालपाटणे येथील रहिवाशी व काँग्रेसचे जुने कार्यकर्ते शंकर आहिरे यांच्या गळ्यात भाजपने यावेळी उमेदवारीची माळ टाकली आणि डॉ. दौलतराव आहेर यांचा प्रभाव व परिवर्तनाच्या लाटेमुळे शंकर आहिरे बागलाण विधानसभा मतदारसंघात निवडून येणारे भाजपचे पहिले आमदार ठरले मतदार संघात त्यांनी अनेक विकास कामे केली २००३ ते २००४ दरम्यान महालपाटणे गावात गिरणा नदीवर शंकर सागर नावाचा बंधारा बांधला. शांत संयमी शेतकऱ्यांसाठी काम करणारे व सहज उपलब्ध होणारे आमदार म्हणून त्यांची ओळख होती. अंत्यसंस्कारावेळी माजी आमदार उमाजी बोरसे माजी जिल्हा परिषद सदस्य अभिमन सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते.