ईनरविल क्लब अपेक्स यांच्याकडून अग्नीशमन दलातील जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा...

लोहोणेर ( प्रतिनिधी ) : - दि २२ सोमवार रोजी ईनरविल क्लबच्या सदस्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने अग्निशामक दलाच्या जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी अग्निशामक दलाचे प्रदिप पवार, दत्तात्रेय नंदाळे, बापु नंदाळे, अनिल निकम, दोधा सोनवणे, भुषण सोनवणे, अतीश गायकवाड, राजेंद्र आहेर, किशोर सोनवणे, विवेक देवरे, धनंजय सोनवणे असे ११ जवान या सोहळ्यास उपस्थित होते. 
"जिथे संकट गंभीर तिथे अग्नीशमन दल खंबीर" या उक्तीप्रमाणे अग्निशमन दलाचे जवान आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा. या दृष्टीने ईनर व्हील क्लबच्या वतीने सर्व जवानांचे औक्षण करून ईनरव्हील क्लबच्या सदस्य नी राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. 
या प्रसंगी इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा योगिता शिरोडे, सचिव सुवर्णा जंगम, आय. एस.ओ. वंदना भामरे, संस्थापक अध्यक्षा वर्षा शिरोडे, कल्पना येवला, अपर्णा येवलकर, माधुरी अमृतकर.,अर्चना सोनवणे, मनिषा अमृतकार, ऍड. रेखा शिंदे, सुरेखा बच्छाव, आणि इतर महिला उपस्थित होत्या.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :