लोहोणेर : सामाजिक व शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने स्थापन झालेल्या संकल्प ग्रुप लोहोणेर यांचेमार्फत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या, अंकलिपी, पेन, पेन्सिल, खोडरबर इ. साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोरोना काळात विलगीकरण कक्षाला पोषक आहार,गावातील स्वच्छतादूतांचा सन्मान,लोहोणेर व ठेंगोडा गावातील आर्थिक दुर्बल कुटुंबियांना किराणा अशा वैशिष्ट्यपूर्ण कामे संकल्प गृपच्या माध्यमातुन यापूर्वी करण्यात आलेली आहेत.
कोरोना काळात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात शाळा बंद असल्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे.जिल्हा परिषद शाळेत आदिवासी तथा आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबातील मुले मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत.या बहुतेक सर्व विद्यार्थ्यांकडे पुरेसे लेखन साहित्य नसल्याने त्याचा परिणाम मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे.या समस्येवर मात करण्यासाठी संकल्प ग्रुपच्या माध्यमातुन आज संकल्प ग्रुपचे शिलेदार कैलास आहिरे,योगेश कोठावदे, मनोज देशमुख,अजित सोनवणे,यशवंत शेवाळे,प्रविण जाधव यांनी प्रातिनिधिक स्वरूपात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक देशमुख,जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश आबा पवार यांच्या उपस्थितीत वाचन लेखन साहित्याचे वाटप केले.
यावेळी शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येऊन भौतिक समस्या सोडविण्याबद्दल योगेश आबा यांनी आश्वासन दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक देशमुख, मुख्याध्यापक केवळ वाघ सर, श्रीमती लिलाबाई शेवाळे, जाधव मॅडम, अश्विनी शेवाळे मॅडम व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
8390172101 - 9765227710 - 7875281316