घोड्याचीआडी येथे राष्ट्रवादी यु. काँ.चे तालुका अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर यांच्या हस्ते मतदान कार्ड वाटप

देवळा - देवळा तालुक्यातील हनुमंतपाडा येथील आदिवासी वस्ती असलेले घोड्याची आडी या अतिदुर्गम भागातील अनेक आदिवासी बांधव मतदान पासून वंचित होते, तर अनेक आदिवासी बांधव मतदान यादीत नाव व मतदान कार्ड या प्रती उदासीन होते वार्षि-हनुमंत पाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम वाघ यांनी सुनील आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे औदासिन्य दूर करून मतदानाचे महत्व समजावून सांगत समुपदेशन केल्याने वस्तीत मतदान कार्डाच्या कॅम्पचे आयोजन करण्यात येऊन ८० आदिवासी बांधवांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर यांच्या हस्ते मतदान कार्ड वाटप करण्यात आले, आहेर यांनी यावेळी विविध समस्याही जाणून घेतल्या व त्या सोडविण्याचे आश्वासनही दिले, यावेळी भास्कर माळी, पुंडलिक आहेर, बानूबाई गवळी, सुनील वाघ, राजेंद्र वाघ, नारायण सोनवणे, राणी सोनवणे, चीला सोनवणे, आदी उपस्थित होते. 

                    




कसमादे मराठी न्यूज  👇


 


                  बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

   8390172101-9765227710-7875281316







Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :